दररोज कच्ची केळी खाण्याचे 5 फायदे

दररोज कच्ची केळी खाण्याचे 5 फायदे
दररोज कच्ची केळी खाण्याचे 5 दररोज केळी खाण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित आहेत. मात्र अनेकांना कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत, हे कदाचित माहित नसावं.

कच्च्या केळांमध्ये पोटॅशियमचा खजाना असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी सक्षम करण्यासोबतच दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत मिळते.

कच्ची केळी खाण्याचे फायदे

1) वजन घटवण्यास मदत-

वजन घटवण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे केळी खाणं टाळतात. मात्र कच्ची खेळी खाल्ल्यामुळे वजन घटवण्यास मदत होते. कच्चं केळ हा तंतूमय पदार्थांचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. ज्यामुळे अनावश्यक फॅट आणि शरिरातील अशुद्धी स्वच्छ होण्यास मदत मिळते.

2) बद्धकोष्ठतेपासून मुक्ती-

कच्च्या केळात फायबर आणि आरोग्यदायी स्टार्च असतं. त्यामुळे आतड्यांमध्ये काहीही न अडकू देता, ते स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रोज कच्चं केळ खाणं फायदेशीर ठरू शकतं.

3) भूख नियंत्रित –

कच्च्या केळामुळे भूख नियंत्रित करणं, शांत करण्यास मदत मिळते. वेळी-अवेळी भूक लागत नाही. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे जंक फूड किंवा फास्ट फूडकडे आपण वळत नाही.

4) मधुमेहावर नियंत्रण

मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनाही कच्ची केळी फायदेशीर ठरू शकते. मधुमेह प्राथमिक स्तरावर असेल, तर कच्ची केळी खाणं सुरु करा. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.

5) पचनक्रिया सुधारते

कच्च्या केळ्याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते. शरीरातील मलनि:सारण प्रक्रिया नीट होते. याशिवाय कच्च्या तेलामुळे हाडं मजबूत बनण्यासही मदत होते.

Comments

Popular posts from this blog

संशोधक व त्यांनी लावलेले शोध

वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम

घरटे उडते वादळात