नामदेव ढसाळ यांची कविता

नामदेव ढसाळ यांची कविता...
बोटाला सुई टोचली
जिव किती कळवळतो,
सूरे तलवारी खसाखस भोकसतात कस वाटत असेल..?
साधा चटका बसला मानुस किती घाबरतो,
साले जिवंत जाळून मारतात कस वाटत असेल..?
साधा पदर ढळला तर बाई किती शरमते,
साले नग्न दिंड काड़तात रे कस वाटत असेल..??
किती यातना,किती अपमान,किती वेदना,कस सोसत असेल..?
आमची हर एक पीढ़ी यांच्या अत्याचारी बलात्कारात कुथत आली,
परिवर्तनाच्या लढाईवर प्रतिगाम्यांचि औलाद निर्दयीपने मुतत आली...!
किती काळ हे असंच चालायच,किती काळ हे सार नीमूट झेलायच्...
आता ठरवलय...
ठेवलेल हत्यार खोलायच
माणसातल जनावर आरपार सोलायच ...
करायची आहेत माणस आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचाय प्रत्येक मनात एक बुद्ध...

Comments

Popular posts from this blog

संशोधक व त्यांनी लावलेले शोध

वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम

घरटे उडते वादळात