पुस्तके पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात, 'तू आम्हास ओळखले कां?'

पुस्तके पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात, 'तू आम्हास ओळखले कां?'
पुस्तके
पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात,
'तू आम्हास ओळखले कां?'
बोलता बोलता पुस्तके वितळतात
आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात
'तू आमच्यात कधी न्हालास कां? पोहलास कां?'
पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात
आणि विचारात ,
'आमची फळे खाल्लीस कां
छायेत कधी विसावलास कां?'
पुस्तके भुरुभुरु वाहणारा वारा होतात
नि विचारात ,
'श्वासाबरोबर आम्हाला कधी उरात साठवलेस कां?'
पुस्तके असेच काही विचारीत राहतात
एकामागून एक.
प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते;
मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत.
तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात
नि म्हणतात ,
'म्हणजे आमचे आयुष्य व्यर्थच ना?'
पुस्तके मूक होतात,
झुरत जातात,
स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात,
शेवटी आत्महत्या करतात ती-
घरातल्या घरात,
बंद कपाटाच्या कारागृहात...
एक अच्छी पुस्तक हज़ार दोस्तों के बराबर होती है जबकि एक अच्छा दोस्त एक लाइब्रेरी (पुस्तकालय) के बराबर होता है

Comments

Popular posts from this blog

संशोधक व त्यांनी लावलेले शोध

वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम

घरटे उडते वादळात