वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम


वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम उदाहरणांन पैकी एक उदाहरण म्हणजे
"नागराज मंजुळे" (अभिनेता आणि दिग्दर्शक)
"सोलापुरच्या करमाळा गावचा वडार समाजाचा मुलगा..ज्याला ७ वीच्या आतच दारू प्यायची सवय लागली..नंतर गांजा,बिड्या ओढणे..अश्लील चित्रपट पाहणे..पुर्णतः वाया गेलेला..७ वीत असताना ६वीतील एक मुलगी आवडायला लागली..त्याचा नालायकपणा मूलीला कळेल म्हणुन घाबरू लागला..विचार बदलू लागले..१०वीत नापास झाला..रिकामा वेळच वेळ..वाचनाचा नाद लागला..मिळेल ते पुस्तक .कोणा एकाकडुन मृत्युंजय हाती लागलं त्याच्या कडुन कळालं अशी पुस्तके लायब्ररीत मिळतात.तेव्हा गावची लायब्ररी गाठली..सगळी पुस्तके वाचुन काढली..विचारांचा वेग वाढला..स्वतः ची तुलना सुरू झाली..अगदी रामायण महाभारतातल्या राक्षसापर्यंत.. बदलाची गरज तीव्रतेने जाणवू लागली..शिक्षण सुरु झाले..पोलीस भरतीस प्रयत्न.. संघात प्रवेश.. नंतर शिवसेनेत प्रवेश.. अनेक दंगलीत सहभाग.. फुले शाहु आंबेडकर साठे शंकर पाटील यांची पुस्तके वाचायला लागल्यावर पुन्हा वैचारिक बदल.. घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याकरिता वडीलांशी वादविवाद.. भूतकाळातील व वर्तमानातील संदर्भ उदाहरणे देऊन वडीलांना आंबेडकर समजावून सांगितले.. M.A मराठी साहित्य पुर्ण..पुढे communication studies ची master degree पुर्ण..कविता लिहू लागला..एक शाँर्ट फिल्म बनवली..नंतर एक सिनेमा बनवला..दिग्दर्शक बनला..अजुनही प्रवास सूरूच आहे...
मी एवढं सगळं ज्या व्यक्तीबद्दल लिहले ..ती व्यक्ति म्हणजे "६१ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट फँड्री" चे दिग्दर्शक "नागराज मंजुळे" भविष्यात कुणीतरी मोठं माणुस बनण्यासाठी आपलाही भूतकाळ असाच असावा असे अपेक्षीत नाही.
"लहानपणी कसे होतो यावरून भविष्याचा अंदाज बांधु नका, बदलाला वाव दिला पाहिजे.. माणुस कधीही बदलू शकतो.. फक्त स्वतः वरच्या विश्वासाला जिवंत ठेवलं पाहिजे"
"वाचाल तर वाचाल"
"पुस्तकाने मस्तक सुधारत आणि जे मस्तक सुधारलेल असत ते कोणा पुढे ही नथमस्तक होत नाही."

Comments

Popular posts from this blog

संशोधक व त्यांनी लावलेले शोध

घरटे उडते वादळात